स्वयंसेवी संस्था: काही निरीक्षणे, काही अनुमाने
गेली काही वर्षे मी स्वयंसेवी संस्थांना जवळून पाहतो आहे. त्यांच्यासोबत काम करतो आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना काही गोष्टी पाहण्यात आल्या, काही कानावर पडत गेल्या, काही वाचनात आल्या. अशा कामाच्या जवळ जाण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांबद्दल मराठी बुद्धिजीवींमध्ये कोणते प्रवाद आहेत; या संस्थांची जनमानसात, विचारवंतांत, कोणती प्रतिमा आहे, याची मला सुतराम कल्पना नव्हती. किंबहुना, मेधा पाटकर, सुरेखा …